आजपासून दिल्ली मेट्रोसाठी वाहनतळाचे नवीन दर लागू

01 May 2018 11:01:24
 
 

 
 
 
 
नवी दिल्ली : आजपासून दिल्ली मेट्रो वाहनतळासाठी नवीन दर लागू करण्यात येणार आहे. मागील दरापेक्षा आत्ताचे दर वाढवण्यात आले असून यामुळे नागरिकांना आता जास्त पैसे वाहन ठेवण्यासाठी आकारावे लागणार आहे. सरकारने हे दर तब्बल ५० टक्क्यांनी वाढविले आहे.
 
 
 
 
चारचाकी गाड्यांना याआधी २० रुपये द्यावे लागत होते आता नागरिकांना यासाठी ३० रुपये द्यावे लागणार आहे. दोनचाकी गाड्यांना १० रुपये भरावे लागत असे आता ही किंमत वाढून १५ रुपये करण्यात आली आहे. सायकलला याआधी ३ रुपये द्यावे लागत होते मात्र आता ही किंमत वाढून ५ रुपये करण्यात आली आहे. 
 
 
 
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनतळ मिळणे तसेच तेथे जागा असेल की नाही याची चिंता देखील वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनतळ शोधणे आणि त्यासाठी लागणारे पैसे मोजणे हे सामान्य नागरिकांच्या खिश्याला परवडणारे नसल्याने सामान्य नागरिक आता हताश झाला आहे. 
 
Powered By Sangraha 9.0