भारताला नेमबाजीत सुवर्ण पदक तर वेटलिफ्टिंगमध्ये रजत पदक

09 Apr 2018 08:46:33
 
 
 
 
 
 
गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी भारताने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले आहे. नेमबाज जितु राय याने १० मीटर एअर पिस्तुलमध्ये ही कामगीरी करून दाखवली आहे. तर प्रदीप सिंह याने वेटलिफ्टिंगमध्ये रजत पदक मिळविले आहे. १०५ किलोग्रॅम वजनी गटात प्रदीप सिंह याने हे रजत पदक पटकावले आहे.
 
 
 
 
 
२३५.१ गुण मिळवत जितु राय याने या स्पर्धेतील सुवर्ण पदक भारताच्या पदरात घातले आहे. तर नेमबाज ओम प्रकाश मिथरवाल याने देखील नेमबाजीत २१४.३ गुण मिळवत कांस्य पदक मिळविले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जितु राय, ओम प्रकाश मिथरवाल आणि प्रदीप सिंग या तिघांना ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या.
 
 
 
 
 
वरील पदकांमुळे आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०१८ च्या पदक तालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर ३१ सुवर्णपदकांसह ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या क्रमांकावर १९ सुवर्णपदकांसह इंग्लंड आणि तिसऱ्या क्रमांकावर ८ सुवर्णपदकांसह भारत विराजमान आहे. भारताला या स्पर्धेत सध्या ८ सुवर्ण, ३ रजत आणि ४ कांस्य पदक मिळाले आहेत सध्या पदकांची एकूण संख्या १५ झाली आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0