सलमान खान याच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी

07 Apr 2018 11:02:43
 
 
 
 
 
 
जोधपुर : काळविट शिकार प्रकरणी ५ वर्षाची शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. जोधपुर येथील न्यायालयात ही सुनावणी सुरु झाली असून सलमानच्या जामीन याचिकेवर ही सुनावणी केली जात आहे. गुरुवारला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खान जोधपुर येथील केंद्रीय कारागृहात कैद आहे.
 
 
 
१९९८ साली हम साथ साथ है चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी मध्यरात्री केलेल्या काळविट शिकार प्रकरणात सलमान खान दोषी आढळला. जोधपुर न्यायालयाने त्याला ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सलमानला त्वरित कारागृहात हलविण्यात आले. तब्बल २० वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून आता या निकालावर सलमान खान याने जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता न्यायालय या जामीन अर्जावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
 
सलमान खान याला शिक्षा झाली असल्याने बॉलीवूड क्षेत्रातील दिग्दर्शक नाराज आहेत. सलमान खान याने बरेच चित्रपट घेवून ठेवले असल्याने आता या चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलले गेले आहे. त्यामुळे दिग्दर्शक यांना याचा चांगलाच फटका बसला आहे. सध्या न्यायालयात या जामीन अर्जावर सुनावणी होत असून आज सलमान खान जामीनावर सुटेल की कारागृहात अडकेल हे समजणार आहे. 
 
Powered By Sangraha 9.0