राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : संजीता चानूने पटकावले वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

06 Apr 2018 08:56:52

 
गोल्ड कोस्ट : भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडू संजीता चानूने ५३ किलोच्या महिला गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. भारतासाठी सलग दुसरा दिवस देखील आनंदाचा ठरला आहे. वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूने काल पहिले सुवर्ण पदक मिळविले होते, त्याचबरोबर गुरुराज पुजारी देखील पुरुष गटातून रौप्य पदकाचा मानकरी ठरला होता.
 
 
दुसऱ्या क्लीन आणि जर्क प्रयत्नात तिने १०८ किलो वजन उचलले. या स्पर्धेत पापुआ न्यू गिनी येथील लोआ डिकाला रौप्य तर कॅनडा येथील राचेल हिला कांस्य पदक मिळाले आहे. पहिल्या दोन दिवसांत पदक पटकावून भारतीयांची दमदार सुरुवात झाली आहे, अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे. खेळाडूंनी पटकावलेल्या पदकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले. आपले खेळाडू देशाची मान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
 
 
गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धांमध्ये भारताकडून वेटलिफ्टिंग सहित बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंग, स्क्वॅश, टेबल टेनिस या खेळांमध्ये सहभागिता नोंदवली जाणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0