जिल्हा वार्षिक योजनेचा जवळजवळ शंभर टक्के निधी खर्च

    दिनांक  05-Apr-2018


बुलडाणा :
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्याला मिळालेला ९९.९८ टक्के इतका निधी विकासकामांना खर्च झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नियोजनानुसारच हा सर्व निधी खर्च करण्यात आला असून विकासकामे करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय यशस्वी झाले असल्याचे देखील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.


बुलडाणा जिल्ह्याला सन २०१७-१८ मध्ये एकूण २०२.८३ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातील एकूण २०२.८२ कोटी रूपये इतका निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी खर्ची पडला आहे. तसेच जिल्ह्याला सर्वसाधारण योजनेत १३८६१.७५ लक्ष निधी महसूली खर्चासाठी आणि ६४२१.२५ लक्ष रूपयांचा निधी भांडवली खर्चासाठी मिळाला आहे. या निधीमधून महसूली खर्चासाठीच्या रकमेतील १३८६१.७४ लक्ष व भांडवली खर्चासाठी प्राप्त निधीमधून ६४२१.२१ लक्ष रूपयांचा निधी खर्ची पडला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे.