दूरदर्शनच्या दर्शकांसाठी आनंदाची बातमी

05 Apr 2018 20:42:16
 
 

 
 
 
 
दूरदर्शनच्या दर्शकांसाठी दूरदर्शन आनंदाची बातमी घेवून आले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून क्रिकेट प्रेमींना भुरळ पाडणारे ‘इंडियन प्रीमिअर लीग’ अर्थात ‘आयपीएल’ हे आता दूरदर्शनच्या स्पोर्ट वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. ७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या ‘आयपीएल सीजन ११’ च्या तयारीला सुरुवात झाली असून सध्या संपूर्ण संघ सामन्यांसाठी तयार झाले आहेत.
 
 
 
 
यंदाच्या आयपीएल क्रिकेट सामन्यामध्ये आठ क्रिकेट संघ भाग घेणार असून हे सामने चेन्नई, मुंबई, पुणे, दिल्ली, मोहाली, जयपूर, इंदौर, हैदराबाद, बंगळूर, कलकत्ता येथील मैदानावर खेळले जाणार आहेत. हे सामने ७ एप्रिलला सुरु होणार असून ७ मे २०१८ ला अंतिम सामना खेळला जाणार आहे. आता हे सामने स्टार स्पोर्ट बरोबर दूरदर्शन स्पोर्टवर देखील प्रसारित केले जाणार आहेत. 
 
 
Powered By Sangraha 9.0