टायगर आणि दिशाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हिट, बागी-२ ने पार केला १०० कोटींचा आकडा

05 Apr 2018 16:46:27
 
 
 
 
 
 
अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनानी यांचे प्रेमप्रकरण कुणाच पासून लपलेले नाही. या दोघांच्या जोडीने आता ऑनस्क्रीन देखील प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळविली आहे. या दोघांचा आगामी चित्रपट बागी-२ ने आज तब्बल १०० कोटींचा आकडा पार केला आहे. १०० कोटींचा आकडा पार करणारा टायगर श्रॉफ यांचा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
 
 
 
 
त्यामुळे दिशा पटनानी ही टायगर श्रॉफची ‘लकी चार्म’ आहे काय? अशा बातम्या सध्या सोशल मिडीयावर चांगल्याच शेअर होतांना दिसत आहेत. यावर्षीचा १०० कोटींचा आकडा पार करणारा बागी-२ हा तिसरा चित्रपट ठरला आहे. याआधी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला होता. त्यानंतर दिग्दर्शक लव रंजन याचा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला होता.
 
 
 
त्यामुळे यावर्षीचा १०० कोटींचा आकडा पार करणारा ‘बागी-२’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे. ‘बागी-२’ मधील टायगर श्रॉफच्या चित्तरंजक कसरती आणि अभिनेत्री जॅकलीन हिचे १२३... हे गाणे प्रेक्षकांचे मूळ आकर्षण होते आणि या आकर्षणाला हा चित्रपट खरा उतरतांना दिसत आहे. या चित्रपटामुळे टायगर श्रॉफच्या भविष्याला वेगळे वळण मिळेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 
Powered By Sangraha 9.0