भारतीय लष्कराने केली हिजबुलच्या 'टायगर'ची शिकार

30 Apr 2018 15:22:06
 
 
 
 
 
 
पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात आज दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे. आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये चकमक सुरु झाली. यावेळी काही दहशतवादी पुलवामा भागात लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती तेव्हापासूनच या भागात शोध मोहीम जोरात राबवली गेली. 
 
 
या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगर आणि अकीब खान मारले गेले आहे. या दहशतवाद्यांचा शोध गेल्या कित्येक दिवसांपासून घेतला जात होता. आता शेवटी मात्र त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दोन दहशतवाद्यांकडून सुरक्षा रक्षकांनी बरीच शस्त्रे जप्त केली आहे. यामध्ये गोळ्या आणि बंदुके जप्त करण्यात आल्या आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0