अभाविपचा सिनेट सदस्य आपल्या भेटीला उपक्रमसिनेट सदस्यांनी विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

28 Apr 2018 23:06:27
 
 
 
 
 
 
अभाविपचा सिनेट सदस्य आपल्या भेटीला उपक्रम
सिनेट सदस्यांनी विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद
जळगाव, २८ एप्रिल
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शुक्रवाररोजी सायंकाळी ७ वाजेला सिनेट सदस्य आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन उमवि परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वस्तीगृहावर करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत उमवि सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे, दिनेश नाईक, मनिषाताई खडके (चौधरी), विद्यार्थी परिषद अध्यक्ष दिगंबर पवार यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनशी चर्चा केली व विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले. विद्यपीठ प्रशासनाला पूर्व कल्पना न देते सिनेट सदस्यांनी वसतिगृह , स्वच्छतागृह व रूमची पाहणी केली . केवळ पाहणी करण्यावर न थांबता सिनेट सदस्यांनी खानावळ मध्ये विद्यार्थ्यांसोबत भोजन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृहतील सुविधा संदर्भात, मेस, पिण्याचे पाणी, परीक्षा, अभ्यासिका व विभागातील अनेक प्रश्न सिनेट सदस्यांना समोर मांडले. विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची पाहणी व त्यांचे प्रश्न मनिषा खडके यांनी प्रत्यक्ष रूमवर जाऊन जाणून घेतले व आगामी काळात विद्यापीठ प्रशासना समोर हे प्रश्न मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे, दिनेश नाईक, मनिषा खडके यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या वेळी अभाविप महानगर सहमंत्री शिवाजी भावसार, पूर्वा जाधव, नगरमंत्री रितेश चौधरी, उमवि अध्यक्ष गोपाळ मोरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट - सिनेट सदस्यांच्या अचानक भेटीने विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून आला. खानावळमध्ये विद्यार्थ्यांसह भोजन केल्याने विद्यार्थी समाधानी असल्याचे दिसले.
Powered By Sangraha 9.0