ठीक आहे, पण मोदींना का लक्ष करता ? : फरहान अख्तर

25 Apr 2018 15:03:15

कॉंग्रेससह सर्व मोदीद्वेषींना दाखवला आरसा




उठसूट कोणत्याही गोष्टींवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करू पाहणाऱ्या सोशल मिडीयावरील काही वाचाळवीरांना प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर यांनी आज चांगलेच धारेवर धरले आहे. आसाराम बापूवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचे बापूबरोबरचे जुने फोटो शेअर कडून विनाकारण त्यांना का लक्ष्य करता ? असा प्रश्न फरहानने उपस्थित केला आहे. तसेच नागरिकांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून काही गोष्टींवर व्यक्त व्हावे, असे आवाहन त्याने केले आहे.
 
फरहानने एक ट्वीट करून मोदींना लक्ष्य करू पाहणाऱ्यांना आरसा दाखवला आहे. 'फरहानने म्हटले आहे कि,' आसाराम बापूवरील बलात्काराचा गुन्हा अखेर सिद्ध झाला आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु काही नागरिक सध्या पंतप्रधान मोदींचे आसारामबापू बरोबर काढलेले काही जुने फोटो सोशल मिडीयावर शेअर करत आहेत. हे करणे त्यांनी थांबवावे. आसारामबापू वरील गुन्हा सिद्ध होण्याअगोदर त्यांच्या बरोबर स्टेज शेअर करणे किंवा फोटो काढणे हा गुन्हा नाही. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांना देखील आसारामबापूच्या गुन्ह्याविषयी काहीही ठोस माहिती नव्हती. त्यामुळे नागरिकांनी आपली बुद्धी वापरून या सर्व घटनेवर प्रतिक्रिया द्यावी'.


फरहानच्या या ट्वीटला सोशल मिडीयावर सध्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी फरहानच्या या वक्तव्याला दुजोरा देत, विनाकारण मोदींना लक्ष करण्याची वृत्ती लोकांनी टाळली पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच नेहमी प्रमाणे काही 'हुशार' व्यक्तींनी फरहानलाच यावर उलटबोल सुनावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान थोड्या वेळापूर्वीच कॉंग्रेसने देखील याच प्रकारे पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याच्या प्रयत्न केला आहे. त्यामुळे फरहानच्या या ट्वीटचा कॉंग्रेस पक्षावर काही परिणाम होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

कॉग्रेसचे ट्वीट :


 
 
Powered By Sangraha 9.0