लोहार्‍यात पिण्याच्या पाण्याचे हाल, मात्र गुरांना खाजगी टँकरवाल्यांकडून दिलासा

25 Apr 2018 12:43:08
 
 
 
लोहारा, ता.पाचोरा :
येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेत पाण्याचा प्रश्न कायम मिटणार असे वाटत होते , मात्र शासकीय यंत्रणांकडून दुर्लक्ष झाल्याचा अनुभव ग्रामस्थांना आला.
 
 
यात झालेल्या कामातून फळ दिसली, अल्प पाऊस झाला जलाशयात जेमतेम पाणी आले, परंतु कोणत्याच जलाशय, धरण यातील पाणी चोरी रोखली गेली नाही, तर मुख्यमंत्री भेट देऊन गेल्यानंतर तद्नंतर कोणत्याच विभागाच्या अधिकार्‍यांनी फारसे लक्ष न दिल्याने पाणीटंचाई निर्माण झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
लोहारा गावाची शांतताप्रिय गाव अशी ओळख कायम आहे सध्यास्थितीत गाव तसं चांगलं पण राजकारणान पांगल असा परिणाम दिसुन आला यामुळेच यंदा अधिक पाणीटंचाईची झळ लोहारा वासियांना सहन करावी लागत आहे त्यात मुकी जनावरे कशी टळतील! माणूस आपल्या व्यथा तोंडाने बोलू शकतो हे मुके जनावर कुणाजवळ आपल्या व्यथा मांडणार? त्यांना मिळेल ते पाणी डबक्या डुबक्यातील पाणी तहान शमविण्यासाठी पिणे भाग आहे ते पण वेळेवर मिळत नाही यांची कदर सध्या खाजगी टँकरवाले करताना दिसून येत आहेत.ते सुध्दा परिसरातील कोणत्यातरी शेतकर्‍याच्या विहिरीवरून पाणी विकत घेतात. पाणीटंचाई असल्यामुळे गरजू टाकीने पाणी घेतात व्यवसाय म्हणून विचार न करता दमडीची अपेक्षा न ठेवता काही खाजगी टँकर वाले येथील बसस्थानक परिसरातील व लेंडी नाला परिसरातील हे दोन हौद दैनंदिन पहिल्याच फेरीला सकाळीच पूर्णपणे भरलेली आढळून येतात यांवरच बर्‍याच गुरांची तहान भागवली जात असल्याने मुक्या जनावरांचा आशीर्वाद घेण्याचा प्रकार येथील खासगी टँकर वाल्यांकडून सुरू आहे.
 
 
पशुपालकांना दिलासा मिळाला आहे जंगल परिसरात कोणत्याही धरणात पाणी नसल्याने गुरेही पाणी पिण्यासाठी धावत येतात. भूतदया,पशूदया दाखवणार्‍या या सहृदय खाजगी टँकरवाल्यांचे कौतुक विषय चर्चेचा ठरला आहे.
 
Powered By Sangraha 9.0