मुंबई - बाली थेट प्रवास आता होणार शक्य

    दिनांक  23-Apr-2018
 
 
 
बाली (इंडोनेशिया) : गेल्या काही दिवसांमध्ये भारताबाहेरील काही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने खूप प्रसिद्ध झाले आहेत. नेपाळ, भूटान, श्रीलंका याप्रमाणे इंडोनेशिया येथील बाली हे देखील एक असेच ठिकाण आहे. ते म्हणजे बाली. गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अनेक भारतीय बालीला भेट देत आहेत. मात्र त्यांना आतापर्यंत थेट बालीला फ्लाइट नसल्याने अडचण येत असत, आज पासून इंडोनेशिया गरुडा या एअरलाइन्सच्या माध्यमातून भारतीयांना थेट बालीला प्रवास करता येणार आहे.


 

बाली : पर्यटकांचा आकर्षण बिंदू :

बाली इंडोनेशियातील एक द्वीप आहे. हे द्वीप पूर्वी जावा येथे स्थित आहे. ई.पू.१५०० साली बाली येथे मजापहित हिंदू राजाचे शासन होते. मात्र कालांतराने मुस्लिम राजवट आल्यानंतर बालीचे स्वरूप बदलले मात्र तरी देखील येथील अधिकांश जनता हिंदू धर्माचे पालन करणारी होती. यानंतर बालीवर डच साम्राज्याचे शासन होते. अखेर कालांतराने बाली स्वतंत्र झाले. आजच्या काळात बाली पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण द्वीप आहे. त्याचे प्रमुख कारण येथील प्राकृतिक सौदंर्य. येथील कला, संगीत, नृत्य आणि संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक जोडपी मधुचंद्रासाठी बालीला येतात. त्याशिवाय बाली येथील समुद्रामुळे गेल्या काही वर्षांमध्ये बालीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला आहे. भारतातील अनेक लोक पर्यटनासाठी जातात. त्यामुळे बालीचे महत्व आता वाढले आहे.
 
भारत आणि इंडोनेशिया येथील लोकांना एकमेकांच्या आणखी जवळ आणण्यासाठी उचलण्यात आलेले हे एक पाऊल आहे. अशी माहिती इंडोनेशिया येथील भारतीय दूतावासाच्या ट्विटर खात्यावरुन देण्यात आली आहे. आतापर्यंत बालीला जाण्यासाठी एकही थेट फ्लाइट नव्हती, मात्र आता पर्यटकांना आणि प्रवाशांना इंडोनेशिया गरूडाच्या माध्यमातून थेट मुंबई ते बाली प्रवास करता येणार आहे.