पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली एंजेला मार्केल यांची भेट

21 Apr 2018 08:39:02
 
 
 
 
 
 
बर्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बर्लिनमध्ये जर्मनीच्या चांसलर एंजेला मार्केल यांची भेट घेतली. ही भेट औपचारिक आणि अतिशय महत्वाची भेट ठरली आहे. नरेंद्र मोदी नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर गेले होते तेथून ते काल भारतासाठी रवाना झालेत. या दौऱ्यातील शेवटचा आणि महत्वाचा टप्पा एंजेला मार्केल यांची भेट हा होता.
 
 
 
 
बर्लिनमध्ये नरेंद्र मोदी यांचे अतिशय आदरतिथ्याने स्वागत करण्यात आले. जेव्हा पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहे तेव्हापासूनच भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांचे संबंध अजून मजबूत होण्यास मदत मिळाली आहे. जागतिक स्थरावर भारताला जर्मनी नेहमीच प्राधान्य देत आला आहे. त्यामुळे भारत आणि जर्मनीचे संबंध अजूच घट्ट आणि इतर क्षेत्रात संबंध वाढावे यासाठी नरेंद्र मोदी यांनी चांसलर एंजेला मार्केल भेट घेतली आहे.
 
 
 
 
एंजेला मार्केल यांनी १४ मार्चला चौथ्यांदा जर्मनीच्या चांसलर पदाचा पदभार सांभाळला आहे. तेव्हापासून भारत आणि जर्मनी यांचे संबंध मजबूत होण्यास मदत मिळाली आहे. भारत आणि जर्मनीमध्ये नेहमीच व्दिपक्षीय संबंध चांगले राहिले आहे. कौशल्य विकास, नदी स्वच्छता, स्मार्ट सीटी, पाणी, रेल्वे स्वच्छता अशा विविध क्षेत्रात जर्मनीकडून भारताला सहयोग मिळू शकते. 
Powered By Sangraha 9.0