महिला व बाल संरक्षण विभागाच्यावतीने भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन

    दिनांक  20-Apr-2018

रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी मोहिम
बुलडाणा : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जिल्ह्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत भिक्षेकरी मुलांच्या पुनर्वसनासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर भीक मागत असलेल्या मुलांना घेऊन त्यांच्या पुढील उज्जवल भविष्यासाठी प्रथमत: त्यांना त्यांच्या कुटुंबात, कुटूंब नसल्यास बाल गृह व निरीक्षण गृहात पुनर्वसन केले जाते. सध्या या मोहिमेमधून दोन मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बाल विकास विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील कुटूंबात वय वर्ष ३ ते ६ वयोगटातील मुले सिल्वासा (दादर नगर हवेली ) सिल्वासा येथे एससीपीएस, आयसीपीएस व डिसीपीयु अंतर्गत कार्यरत असलेले अधिकाऱ्यांना भीक मागताना आढळून आले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या मुलांना बुलडाणा येथे आणून जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलडाणा यांच्या स्वाधीन केले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलडाणा यांच्या माध्यमातून भिक मागतांना आढळून आलेल्या कुटूंबातील सदर बालकांची शासकीय रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर करून त्यांची सविस्तर विचारपूस करण्यात आली. त्यांच्या कुटूंबियांकडून लेखी स्वरूपात ह्यानंतर बुलडाणा जिल्हा सोडून जाणार नसून कोणत्याच प्रकारे बालकाकडून भिक्षा मागवणार नाही, असे लिहून घेण्यात आले. तसेच त्यांच्या शिक्षणासाठी बाल विकास विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.