डिजिटल पेमेंटमध्ये भारताची दिवसेंदिवस प्रगती

02 Apr 2018 18:29:01
 
 
 
 
 
 
डिजिटल पेमेंटमध्ये भारताची दिवसेंदिवस प्रगती होत असून भारतीय नागरिक डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पैश्यांचा भरणा करीत असल्याची माहिती सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अर्थांत एसटीपीआयने आज एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. एका सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे.
 
 
 
 
 
 
भारत डिजिटल क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती करीत असून देशातील नागरिक डिजिटल प्रणालीचा जास्तीतजास्त वापर पैश्यांचा भरणा करण्यासाठी करीत आहे असे या सर्वेक्षणानुसार पुढे आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये ९.०७ दशलक्ष नागरिक डिजिटल प्रणालीचा वापर करीत होते, तीच संख्या वाढून जानेवारी २०१८ मध्ये ९.५७ दशलक्ष एवढी झाली तर फेब्रुवारी २०१८ मध्ये ही संख्या वाढून ९.८८ दशलक्ष एवढी झाली आहे.
 
 
 
‘भीम अॅप’च्या मदतीने नागरिक हा सगळा भरणा करीत असून ‘पे-टीएम’अॅपचा वापर देखील यात जास्त प्रमाणात केला जात आहे. पेट्रोलपंप, वस्तू खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतांना नागरिक या सगळ्या अॅपचा वापर करतात असे या सर्वेक्षणात पुढे आले आहे. त्यामुळे भारत जोमाने डिजिटल पेमेंटकडे वाटचाल करीत आहे असे या सर्वेक्षणानुसार दिसून येत आहे. 
 
Powered By Sangraha 9.0