मोदी, गडकरी आणि फडणवीसांमुळे अनेकांची दुकाने बंद झाली

    दिनांक  19-Apr-2018

 
 
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकाने बंद झाली आहेत, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आज नांदेड येथे आजोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यामुळेच समाजात जातीय तेढ निर्माण झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
जलयुक्त शिवारची प्रशंसा :
यावेळी नितीन गडकरी यांनी जलयुक्त शिवारची प्रशंसा केली. तसेच यावेळी मराठवाड्याला केंद्रीय जलसंधारण विभागाकडून एक लाख कोटीचा निधी देण्याची घोषणाही केली.
जो ज्या जातीचा असतो, तो कधीच त्या जातीचा विकास करत नाही :
वीज, पाणी आणि रस्ते हे विकासात अत्यंत महत्त्वाचे असतात. जो ज्या जातीचा असतो तो कधीच त्या जातीचा विकास करत नाही, तसंच जो ज्या भागाचा नेता असतो तो तिथला विकास करत नाही हे सत्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले.