'या' चित्रपटात दिसणार माधुरी दीक्षित-संजय दत्त पुन्हा एकत्र!

18 Apr 2018 13:14:22

 
 
 
नव्वदच्या दशकात त्यांच्या प्रेमप्रकरणाची भरपूर चर्चा झाली, त्यावर अनेक लेख छापून आले पण या दोन कलाकारांनी याबद्दल कधीही जाहीररीत्या कोणतेही भाष्य केले नाही. १९९३ साली खलनायक या चित्रपटात एकत्र काम करणारी माधुरी दीक्षित आणि संजय दत्त ही त्याकाळची सुपरहिट जोडी तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली आहे. एप्रिल २०१९ला प्रदर्शित होणाऱ्या 'कलंक' या हिंदी चित्रपटातून पुन्हा एकदा संजू बाबा व माधुरी आपल्याला एकत्र दिसणार आहेत. भूतकाळात काय घडलं, काय चर्चा झाली या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे दोघे आपल्या चाहत्यांसाठी एकत्र आल्याने सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
 
 
संजय दत्तने आज 'कलंक' चित्रपटाचे पोस्टर ट्विटरवर पोस्ट केले आहे. हा चित्रपट एक प्रकारचा एपिक ड्रामा असून अभिषेक वर्मन याचे दिग्दर्शन करत आहे. विशेष म्हणजे करण जोहरच्या धर्म प्रॉडक्शनकडे या चित्रपटाच्या निर्मितीची जबादारी आहे. यामध्ये वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा व आदित्य रॉय कपूर हे नव्या दमाचे कलाकारही आपल्याला बघायला मिळणार आहेत.
 
 
 
'कलंक' या चित्रपट माधुरीची भूमिका याआधी श्रीदेवी करणार होती. परंतु तिच्या आकस्मित निधनामुळे दिग्दर्शक व निर्मात्यांनी या भूमिकेसाठी माधुरीला विचारणा केली. माधुरीने या भूमिकेसाठी होकार दिल्यावर श्रीदेवीची मुलगी जानव्ही कपूरने यासंदर्भात इंस्टाग्रामवर आभार व्यक्त करणारी एक पोस्टही प्रसिद्ध केली होती. आज या बाबतची अधिकृत घोषणा झाल्याने संजय दत्त आणि माधुरीला पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0