तामिळनाडूतील भाजप कार्यलयावर बॉम्ब हल्ला

07 Mar 2018 08:04:36

जीवित व वित्तहानी नाही





कोइम्बतुर :
तामिळनाडूमधील कोइम्बतुर येथे असलेल्या भाजप कार्यालावर आज सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. सुदैवाने या बॉम्बचा स्फोट न झाल्यामुळे कसल्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. दरम्यान हल्ल्यानंतर कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

आज पहाटे अंदाजे ५ सुमारस ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे काही अज्ञात हल्लेखोर कार्यालयाच्या एका बाजूने धावत आले व हातातील पेट्रोल बॉम्ब पेटवून तो कार्यलयाच्या दिशेने भिरकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु कार्यालयाबाहेर काही भाजप कार्यकर्ते पाहून त्यांची धांदल उडाली व ते गडबडीत बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकून पसार झाले. या गडबडीमध्ये बॉम्बच बॉम्ब व्यवस्थित न पेटल्यामुळे कसल्याही प्रकारची हानी झाली नाही. दरम्यान घडलेला सर्व प्रकार हा कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाला आहे.

या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांनी भाजपच्या नेत्यांना या घटनेविषयी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत असून राजकीय द्वेषातूनच हा हल्ला करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0