सनरायझर्स हैदराबाद संघात आता डेविड वॉर्नरच्या जागी अॅलेक्स हेल्स

31 Mar 2018 16:32:25
 
 
 
 
 
 
बॉल टेंपरिंगमुळे अडचणीत आलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू डेविड वॉर्नर यांच्या यंदाच्या आयपीएल प्रवेशावर रोख आणण्यात आली आहे. त्यामुळे डेविड वॉर्नरच्या जागी सनरायझर्स हैदराबाद संघात कोण खेळणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती आता ही उत्सुकता संपली असून डेविड वॉर्नरच्या जागी इंग्लंडचा क्रिकेटर अॅलेक्स हेल्स हा खेळणार आहे.
 
 
 
 
 
डेविड वॉर्नरच्या याच्या जागी आता अॅलेक्स हेल्स याला संघात प्रवेश देण्यात आला असून अॅलेक्स हेल्स हा सनरायझर्स हैदराबाद या संघात खेळणार आहे. बॉल टेंपरिंग प्रकरणात अडचणीत आल्यावर डेविड वॉर्नर याने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये डेविड वॉर्नर खेळणार काय यावर प्रश्नचिन्ह होते.
 
 
 
 
मात्र आता या प्रश्नचिन्हावर विराम लागला असून डेविड वॉर्नरच्या जागी अॅलेक्स हेल्स खेळणार हे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0