पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान गप्प का : सुरजेवाला

29 Mar 2018 13:07:18

 
 
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सी.बी.एस.ई. १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. सी.बी.एस.ई. परीक्षांमध्ये १०वीचा गणिताचा पेपर आणि १२वीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सी.बी.एस.ई. ने या विषयांच्या पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचा सगळीकडून विरोध करण्यात येत आहे.
 
 
 
 
 
 
 
"मोदी सरकारचे नाव बदलून पेपरफुटी सरकार ठेवा" :

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना सुरजेवाला म्हणाले की, "मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहे. इतकी मोठी घटना घडली मात्र ते अद्याप गप्प का? ते काय निर्णय घेणार आहेत? ते सी.बी.एस.ई.च्या अध्यक्षांना पदावरुन काढून टाकतील का इतर काही निर्णय घेतील? या सरकारचे नाव मोदी सरकार नाही "पेपरफुटी सरकार" असायला हवे असा आरोप सुरजेवाला यांनी केला.
 
 
या संदर्भात दिल्ली येथे जंतरमंतरवर १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. चूक सी.बी.एस.ई. बोर्डाची असताना त्याचा परिणाम विद्यार्थांनी का भोगावा? असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला असल्याकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधले.
 
 
Powered By Sangraha 9.0