तीन तलाक कायद्याविरोधात मुस्लिम महिला उतरल्या रस्त्यावर

29 Mar 2018 12:45:48

पाचोरा येथे तहसीलदारांना निवेदन

 
 
पाचोरा :
केंद्र सरकारच्या प्रस्तावित तीन तलाक कायद्याविरोधात येथील मुस्लिम महिलांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चानंतर तहसीलदार बी.ए. कापसे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
 
 
संभाजीनगरातील जि.प. उर्दू शाळेपासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा पुढे व्ही.पी. रोड, पंचमुखी हनुमान चौक, मच्छीबाजार, हुसेनी चौक, देशमुखवाडीमार्गे तहसील कार्यालयावर पोहचला. मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी तीन तलाक कायद्याला विरोध दर्शवणार्‍या घोषणांचे फलक हाती घेतले होते.
 
 
मुस्लिम पर्सनल बोर्ड कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर तहसीलदार कापसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड व पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0