हि चूक मी कधीही विसरणार नाही - स्टीव्ह स्मिथ

29 Mar 2018 15:45:58

 
सिडनी : बॉल टेंपरिंगच्या प्रकरणात कर्णधार पद गमावलेला ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ प्रथमच माध्यमांच्या समोर आला. आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तो ढसाढसा रडला. ही चूक मी कधीही विसरू शकणार नाही, मी पूर्णपणे उध्वस्थ झालो आहे, मला माफ करा, असे उद्गार त्याने यावेळी काढले.
 
 
बॉल टेंपरिंगच्या प्रकरणावरून स्टीव्ह स्मिथवर एक वर्षाची क्रिकेटबंदी लावण्यात आली आहे. एकूण पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथला आपली चूक पुरती लक्षात आल्याचे दिसून येत होते. चेंडू कुरतडण्याच्या चुकीमुळे अवघे करिअर कुरतडले गेले, असे त्याने मान्य केले आहे. त्याचबरोबर काळ हा सर्व जखमांवर मलम असतो. त्याप्रमाणे यातून देखील लवकरच बाहेर पडेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
 
 
 
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या केपटाऊन येथे कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यातील चेंडूबरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज कॅमेरोन बेनक्रॉफ्ट आणि वॉर्नर हे चेंडूबरोबर छेडछाड करत असल्याचे सामन्या दरम्यान कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. सामना संपल्यानंतर बेनक्रॉफ्ट याने आपला गुन्हा कबूल केला. कर्णधार स्मिथने देखील यावर प्रतिक्रिया देत 'बॉल टेपरिंग' केल्याचे कबुल केले व त्यानंतर स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनीही आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा लागला.
 
 
Powered By Sangraha 9.0