ग्रामीण भागात शौचालयांचा वापर ९३ टक्क्यांहून अधिक

28 Mar 2018 17:29:21

 
 
नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत, स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेने राष्ट्रीय वार्षिक ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण केले. यात ग्रामीण भारतात ९३.४ टक्के नागरिक शौचालयांचा वापर करत असल्याचे आढळून आले. नोव्हेंबर २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये देशभरातल्या ६ हजार १३६ गावांमधल्या ९२ हजार ४० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.
 
७७ टक्के घरांमध्ये शौचालयाची सुविधा असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. पूर्वी हागणदारीमुक्त घोषित गावांचे सत्यापन केल्यापैकी ९५.६ टक्के गावे हागणदारीमुक्त, उर्वरित ४.४ गावांपैकीही ९५ टक्क्यांहून अधिक स्वच्छता आढळून आली.
 
Powered By Sangraha 9.0