भिडेंच्या अटकेप्रकरणी पंतप्रधानांचा हस्तक्षेप : प्रकाश आंबेडकर

26 Mar 2018 12:26:08

 
मुंबई : संभाजी भिडेंना अटक होऊ नये म्हणून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी हस्तक्षेप केला आहे, असा सनसनाटी आरोप भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभाजी भिडे गुरुजी यांच्या अटके भारिपकडून मुंबईमध्ये  एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे, या मोर्चा दरम्यान ते बोलत होते.

मोदींचे भिडेंबरोबर अत्यंत जवळची संबंध आहेत, त्यामुळे भिडेंना अटक होऊ नये, म्हणून स्वतः मोदी भिडेंना पाठीशी घालत आहेत. सरकार देखील हे आंदोलन दाबण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न आहे, परंतु सरकारने कितीही प्रयत्न केले तरी देखील हे आंदोलन होणारच आणि जोपर्यंत भिडेंना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन अशाच प्रकारे सुरु राहणार आहे, असा आंबेडकर यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान आझाद मैदानावर आणि सीएसटी समोर मोर्चेकरांनी प्रचंड गर्दी केली आहे. अजूनही काही मोर्चेकरी आंदोलनस्थळी दाखल होत आहे. त्यामुळे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सामान्य नागरिकांना या मोर्चाचा त्रास होऊ नये, म्हणून मुंबई पोलिसांनी आंबेडकर यांना मोर्चा न काढण्याची आवाहन केले आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करत मोर्चा होणारच असा ठाम निर्णय आंबेडकर यांनी घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0