मोर्चाकरांमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी
नागरिकांना वेठीस धरू नये, मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबई : भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी भारिपकडून पुकारण्यात आलेल्या एल्गार मोर्चासाठी राज्यभरातून नागरिक मुंबईमध्ये दाखल होते आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनानुसार सर्व मोर्चेकरांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदानवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. आतामध्ये निळे झेंडू घेऊन तसेच भिडे यांच्या अटकेची मागणी करत मोर्चेकरी सध्या सीएसटीसमोर निदर्शने करत आहेत.
दरम्यान या काळामध्ये कसलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीएसटी ते विधानसभेपर्यंतच्या परिसरात जागोजागी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तसेच सीएसटी आणि विधीमंडळाजवळ दंगल विरोधी पथक देखील तैनात करण्यात आले आहेत. मोर्चाकरी हातामध्ये निळे झेंडे आणि फलक घेऊन संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणा देत आहेत, तसेच सरकारने त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील करत आहेत. थोड्या वेळानंतर प्रकाश आंबेडकर हे सीएसटीजवळ येणार आहेत व त्यानंतर या मोर्चा सुरुवात करण्यात येणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या या मोर्चाला परवानगी देण्यास मुंबई पोलिसांनी काल नकार दिला होता. आंबेडकर यांनी आंदोलन अथवा निदर्शन करावे, परंतु नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा काढणे टाळावे, असे म्हणत पोलिसांनी आंदोलना परवानगी दिली. परंतु मोर्चाला परवानगी देण्यास नकार दिला. यावर आंबेडकर यांनी राज्य सरकारला लक्ष्य करत, 'सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे' असा आरोप केला होता. तसेच पोलिसांनी जरी परवानगी नाकारली तरी देखील मोर्चा होणारच, असे म्हटले होते.