गाळेधारकांचे महापौरांना निवेदन

24 Mar 2018 11:46:33

 
 
जळगाव :
गाळेधारक कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे व सदस्य यांनी महापौर ललित कोल्हे यांना गाळेधारकांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
 
 
याप्रसंगी राजकुमार अडवाणी, राजस कोतवाल, संजय पाटील, तेजस देपुरा, विलास सांगोरे व सहकारी उपस्थित होते. नगरसेवकांना गुलाबाचे फूल देऊन गाळ्यांचा प्रश्‍न सोडविण्याची विनंती गाळेधारकांच्या वतीने करण्यात आली.
२००४ मध्ये चार व्यापारी संकुलांचा ७९ ड अंतर्गत ९ वर्षांचा करार करून नूतनीकरण करण्यात आले होते. तो नियम आजही अस्तित्त्वात असताना त्याची अमलबजावणी का करण्यात येत नाही? असा सवाल गाळेधारकांनी निवेदनात केला आहे.
मागील पाच वर्षांची बिले रद्द करून सुधारित योग्य ती बिले अदा करण्यात यावी. ३१ मार्च २०१८ पूर्वी हा विषय संपुष्टात आणावा, अशी मागणी करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0