बाप कूल बेटा ओल्ड स्कूल : अमिताभ ऋषिची एकनंबर जोडी

23 Mar 2018 17:20:39

 
 
मुंबई :  सिनेसृष्टीत अमिताभ आणि ऋषि कपूर यांनी एकत्र एक काळ गाजवलाय. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. त्यापैकी अमर, अकबर अॅन्थोनी अगदी पहिल्यानंबर वर आहे. ही जोडी तब्बल २७ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येत आहे, "१०२ नॉट ऑउट" या चित्रपटात. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर १ महिन्याने या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले आहे. "बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल" असे म्हणत खुद्द अमिताभ यांनी आपल्या इंस्टाग्राम खात्यावरुन हे पोस्टर शेअर केले आहे.
 
 
 
 
 
खरी गंमत म्हणजे या चित्रपटात अमिताभ बच्चन ऋषि कपूर यांच्या पित्याच्या भूमिकेत आहेत. "स्वत:च्या मुलाला वृद्धाश्रमात पाठवणारा मी पहिलाच बाप असेन." असा संवाद या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बघून प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. कपूर अॅण्ड सन्सनंतर पुन्हा एकदा ऋषि कपूर एका वेगळ्या 'लुक' मध्ये दिसणार आहेत.
 
 
 
 
 
४ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेक वर्षांनंतर अमिताभ आणि ऋषि कपूर यांना बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. त्यातून या चित्रपटाचा विषय भन्नाट असल्याने ही उत्सुकता अधिकच ताणल्यागेली आहे.
Powered By Sangraha 9.0