टीडीपीची विरोधकांशी चर्चा सुरु

19 Mar 2018 10:35:28

विरोधकांशी चर्चा करून मांडणार 'अविश्वास ठराव'




नवी दिल्ली :
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर तेलगु देशम् पक्षाने (टीडीपी) विरोधकांशी चर्चेला सुरुवात केली आहे. संसदेतील सर्व विरोधकांशी चर्चा करून या अधिवेशनात सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार असल्याचे टीडीपी म्हटले आहे. तसेच यासाठी सर्व विरोध आपल्या पाठींबा देखील देतील, असे टीपीपीने म्हटले आहे.

दरम्यान यासाठी टीडीपीने आपल्या सर्व खासदारांसाठी पक्षादेश काढला असून अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावे, असे टीडीपीने म्हटले आहे. तसेच भाजप सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी सध्या तृणमूल कॉंग्रेस, कॉंग्रेस, सपा यांच्याशी चर्चा सुरु असल्याचेही टीडीपीने म्हटले आहे.

पक्ष सर्वांशी चर्चेला तयार : भाजप

टीडीपीच्या या निर्णयानंतर भाजपने या संबंधी सर्व मित्र पक्षांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. भाजप हा देशाचा आणि सामन्य जनतेचा विचार करूनच कार्य करत आहे, त्यामुळे आघाडीच्या पक्षांमध्ये असलेले सर्व किंतुपरंतु चर्चेच्या मार्गातून सोडवले जातील, असे पक्षांकडून सांगण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0