तामिळनाडूच्या राजकरणात आणखीन एक वादळ

15 Mar 2018 10:23:10

टीटीव्ही दिनाकरन यांची नव्या राजकीय पक्षाची घोषणा



मदुराई : ऑल इंडिया आण्णा द्रमुख पक्षाचे बंडखोर आमदार तसेच शशिकला नटराजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार टीटीव्ही दिनाकरन यांनी आज आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या नावावरून या पक्षाचे 'अम्मा मकल मुनेत्र कळघम' असे नामकरण करण्यात आले असून जाहीर सभेमध्ये दिनाकरन यांनी आज आपल्या पक्षाची घोषणा केली.

मदुराई येथे एका जाहीर आज दिनाकरन यांनी आयोजन केले होते. यासभेमध्ये सध्या तामिळ राजकारणावर त्यांनी टीका केली व त्यानंतर आपल्या पक्षाचा स्वतंत्र ध्वजाचे अनावरण करून पक्षाचे नाव जाहीर केले. पक्षाचा ध्वज हा तिरंगी असून त्यांच्या मध्यभागी जयललिता त्यांची प्रतिमा बनवण्यात आली आहे. तसेच यावेळी व्यासपीठाजवळ एम.जी.रामचंद्रन, जयललिता, शशिकला नटराजन आणि अन्य दोन नेत्यांच्या भव्य प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या.
जयललिता यांच्या मृत्यूनंतर अस्थिर झालेले तामिळनाडूचे राजकारणात अजून स्थिर पदावर आलेले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध सिनेअभिनेते रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर कमल हसन यांनी देखील आपल्या स्वतंत्र पक्षांची घोषणा केली आहे. त्यामुळे तामिळ राजकारणात आता एआयएडीएमके आणि डीएमके या दोन पक्षांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली होती. यानंतर आता दिनाकरन यांच्या पक्षाच्या आगमनामुळे तामिळ राजकारणात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0