नवी दिल्ली : प्रसिद्ध खोगल शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे आज पहाटे इंग्लंडमध्ये निधन झाले आहे. हॉकिंग यांच्या जाण्यानंतर जगभरासह भारतातून देखील शोक व्यक्त करण्यात येत आहे. हॉकिंग यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. तसेच 'ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो' अशी प्रार्थना दोन्ही नेत्यांनी केली आहे.
स्टीफन हॉकिंग यांच्या जाण्याची बातमी ही अत्यंत दुखद आहे. त्यानी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे विश्वातील अनेक रहस्यांचे उकल केली. त्यांच्यामुळे आपल्या ब्रम्हांडातील अनेक मनोरंजक गोष्टींविषयी आपल्याला माहिती झाली, असे कोविंद यांनी म्हटले आहे. याचबरोबर हॉकिंग यांची त्यांच्या कार्यांमधील लवचिकता आणि त्यांचे धैर्य हे येणाऱ्या अनेक पिढ्यांना नेहमी प्रेरणा देत राहील, असे देखील कोविंद यांनी आज म्हटले.
याच बरोबर भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील हॉकिंग यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे. 'ब्रम्हांडातील अनेक रहस्य उलघडणार शास्त्रज्ञ' अशा शब्दात नायडू यांनी हॉकिंग यांच्या कार्याचा गौर केला आहे.
पंतप्रधान मोदींनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. 'प्रो. हॉकिंग हे अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ होते तसेच एक उत्तम शिक्षक देखील होते. आपले विश्व सुंदर आणि चांगले व्हावे, यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे अचानक जाणे हे अत्यंत वेदनादायी आहे. त्यांची आपल्या जीवनातील दृढता आणि त्यांचे धैर्य या दोन गोष्टी जगातील अनेकांना नेहमी प्रेरणा देत राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो,' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.