तब्बल २५ वर्षांनी लाराचा 'हा' विश्वविक्रम तोडून कोहली अव्वलस्थानी!

20 Feb 2018 17:12:02


 
विराट कोहली, वय वर्ष अवघे २९. पण त्याची खेळी केवळ आवक करणारी. दिवसेंदिवस तो त्याच्या खेळाने अक्षरशः त्याच्या चाहत्यावर मोहिनी टाकत आहे व क्रिकेटविश्वातले सर्व विक्रम मोडीत काढत आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध नुकत्याच झालेल्या सहा एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने मालिकावीरचा किताब तर पटकाविलाच पण त्याशिवाय या मालिकेनंतर त्याने आणखी एक मोठा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
 
 
कोहलीने या मालिकेत बहारदार फलंदाजी करत (११२, ४६, १६०, ७५, ३६ व १२९) ५५८ धावा कुटल्या. यामुळे आयसीसी क्रमवारीत कोहली अव्वलस्थानी पोहचला आहे. पण यावेळी त्याने गाठलेले अव्वलस्थान हे विशेष आहे. कारण यावेळी अव्वलस्थानी पोहचल्यावर त्याला मिळालेले रेटिंग गुण हे ९०९ आहेत. याआधी २६ मार्च १९९३ रोजी ब्रायन लाराने ९०८ गुणांसह आयसीसीच्या क्रमवारीत अव्वलस्थानी मिळवले होते. लारा नंतर ९०८ गुणांचा हा आकडा एकही फलंदाज गाठू शकला नाही. त्यामुळेच तब्बल २५ वर्षांनी लाराचा हा विक्रम तोडण्याचा मन कोहलीने पटकावला आहे.
 

 
 
 

 
 
फलंदाजीच्या सरासरीतही कोहली आजमितीला अव्वल खेळाडू समजला जात आहे. कोहलीने २०८ सामन्यात ५८. १ च्या सरासरीने ९५८८ धावा केल्या आहेत. या त्याच्या खालोखाल मिशेल बेवन (५३.५८), एबी डिव्हिलिअर्स (५३.५), एमएस धोनी (५१. ३७) सरासरीच्या बाबतीत या खेळाडूंचे नाव घेतले जात आहे. नेदरलँडचा तुफानी फलंदाज रायन याची सरासरी (६७) कोहली पेक्षा अधिक आहे, पण आयसीसीच्या नियमानुसार ५० किंवा त्यापेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या फलंदाजांचीच नोंद या यादीत केली जाते. रायनने आजपर्यंत केवळ ३३ सामनेच खेळले आहेत.
 

 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0