१० वर्षांनी भारत दौऱ्यावर आलेल्या हसन रुहानी यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत

17 Feb 2018 08:57:05

 
नवी दिल्ली : इराणचे राष्ट्रपती डॉ. हसन रुहानी यांचा भारत दौरा सुरु आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत दाखल झालेल्या रुहानी यांचे आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे भव्य स्वागत करण्यात आले.
आज इराण आणि भारत यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. व्हिसाबाबतच्या अटी भारतने शिथिल केल्या पाहिजे, अशी इराणची अपेक्षा आहे. त्याचबरोबर तेल आणि नैसर्गिक वायू व्यापारात दोन्ही देशांत वाढ व्हावी हा देखील चर्चेचा मुद्दा असेल.
 
 
 
शुक्रवारी हैदराबाद येथे मशिदीत त्यांनी नमाज अदा केला, त्यानंतर तेथील उपस्थितांना संबोधित करत ते म्हणाले की, साम्पूर्व विश्व ज्या काळातून जात आहे, त्यात तेहरान आणि नवी दिल्ली महत्वाची भूमिका बजावू शकतात. चाबाहर बंदराच्या निर्मितीचे देखील त्यांनी महत्व यावेळी सांगितले. पाकिस्तानला वळसा घालून भारत मध्य आशिया आणि युरोपात आपले स्थान निर्माण करू शकतो, असे देखील ते यावेळी बोलले.
 
 
भारतातील विविधता, त्यातील एकता याविषयावर देखील त्यांनी भाष्य केले. येथील विविध पंथ संप्रदाय एकत्र गुण्यागोविन्दाने नांदतात हा त्यांच्यासाठी सकारात्मक विषय ठरला.
 
 
Powered By Sangraha 9.0