नेपाळचे पंतप्रधान 'देऊबा' यांचा राजीनामा

    दिनांक  15-Feb-2018

के.पी.ओली बनणार पुढील पंतप्रधान
काठमांडू :
नेपाळमध्ये नुकताच पार पडलेल्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या नेपाळच्या डाव्या आघाडीच्या सत्ता स्थापनासाठी नेपाळचे वर्तमान पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी आपली पदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळच्या जनमताचा आदर करून विजयी पक्षाला देशात सत्ता स्थापन करता यावा, यासाठी हा राजीनामा देत आहोत, असे स्पष्टीकरण देऊबा यांनी दिले आहे.

देऊबा यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी नेपाळच्या डाव्या आघाडीनी आपले नेते के.पी.ओली यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे देऊबा यांच्या राजीनाम्यानंतर ओली यांच्या नावावर नवे पंतप्रधान म्हणून शिक्कामोर्तब झाला आहे. तसेच पुढील आठवड्यामध्ये ओली यांचा शपथविधी पार पडणार असून पंतप्रधान पदाची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात येणार आहेत.

आपल्या राजीनाम्यानंतर देऊबा यांनी देशाच्या प्रसारवाहिनीच्या माध्यमातून नेपाळच्या जनतेशी संवाद साधला. यामध्ये जनतमताचा आदर करून आपण आपल्या पदाचा राजीनाम देत असल्याचे देऊबा यांनी म्हटले. नुकताच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये नेपाळी जनतेनी डाव्या आघाडीला आपला कौल दिला आहे. त्यामुळे डाव्या आघाडीला सत्ता स्थापन करता यावी, म्हणून हा राजीनाम देण्यात येत असल्याचे सांगत डाव्या आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा देखील यावेळी दिल्या.