ड्रायव्हिंग लायसन्सवर होणार अवयवदानाच्या इच्छेची नोंद

08 Dec 2018 18:48:57



 
 
 
नागपूर : समाजात अवयदानाबद्दल जनजागृती होण्याची खूप गरज आहे. अनेकजणांना इच्छा असूनही अवयवदान करता येत नाही. आता यापुढे ज्या व्यक्तीची अवयव दान करण्यची इच्छा असेल. त्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर ही गोष्ट नमूद करण्यात येणार आहे. लवकरच अशी सोय आता केली जाणार आहे. ही माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.
 

एका वेबसाईटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटंबातील सदस्यांचा आज नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्याक्रमात सत्कार करण्यात आला. आता रस्तेवाहतुकी दरम्यान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सहा तासांच्या आत त्याचे अवयवदान करता यावी अशी सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अवयअवदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर तशी नोंद करण्यात येणार आहे.” असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

 

अवयवयदानाचे प्रमाण भारतामध्ये खूपच कमी आहे. योग्य वेळी अवयवाचे प्रत्यारोपण न करता आल्यामुळे भारतात दरवर्षी सुमारे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अवयवदानाचा दर वाढविण्यासाठी त्याबाबतीत लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. वाहतूक खात्याचा निर्णय येणाऱ्या काळात अनेकांसाठी जीवनदाता ठरणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0