वरणगांवला बसेसअभावी विद्यार्थ्यांचे हाल

08 Dec 2018 10:39:35

 
 
वरणगांव : 
 
भुसावळ बसस्थानकातून वरणगांव, बोदवड, फॅक्टरी, कठोरा, ओझरखेडा येथे बसेस नियोजनाप्रमाणे सुटत नसल्याने विद्यार्थ्यांसह वृध्द प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. यामुळे महामंडळाच्या नियोजनाबद्दल नाराजी व संताप व्यक्त होत आहे.
 
विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर दोन तास ताटकळत एखाद्या दुकानावर उभे राहावे लागते, एकच बस आल्याने आधीच भुसावळहून प्रवासी बसलेले असतांना विद्यार्थ्याना जागा मिळत नाही.
 
प्रवाशांच्या गर्दीत विद्यार्थिनीसह वृध्दांचे हाल होतात. काहींना बसमधे चढता न आल्याने पुन्हा एक तास बसची वाट पहावी लागते. शाळा सुटण्याच्या वेळेवर दोन बसेस सोडा अशी मागणी होत आहे.
 
इतर वेळेला खाली बस पळवून मंडळ काय हित साधते हा प्रश्न आहे. आगारप्रमुखांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0