कसे असेल मराठा समाजाचे जात प्रमाणपत्र?

08 Dec 2018 16:11:22



मुंबई : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या १६ टक्के आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर राज्य सरकारने आता मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. त्याचप्रमाणे ही दोन्ही प्रमाणपत्रे कशी असतील? याचे नमुने जारी केले आहेत.

 

मराठा समाजासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर कऱण्याची सुचना केली होती. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्य सरकारने एटीआर आणि विधेयक सादर करून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला. या विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केले.

 

 
 

राज्यात ७५ हजार जागांची मेगा भरती होणार आहे अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. या मेगा भरतीत मराठा समाजाला या प्रवर्गाचे फायदे मिळावेत आणि आगामी मेगा भरतीत सोईचे व्हावे म्हणून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0