डोंगरकठोरा आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना लाच घेताना अटक

07 Dec 2018 13:26:02

भुसावळ : 
 
भाजीपाला पुरवठादाराचे बिल काढण्यासाठी पाच हजारांची मागणी करणार्‍या यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे (56, सिद्धेश्वर नगर, देना नगरजवळ, जामनेर रोड, भुसावळ) यांना लाच घेताना शाळेच्या बाहेर गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक करण्यात आली.
 
तक्रारदाराने आश्रमशाळेला भाजीपाल्याचा पुरवठा केला होता तर त्याचे बिल बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात आरोपी असलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
 
याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी आश्रमशाळेच्या बाहेर लाच घेण्यासाठी आल्यानंतर पथकाने त्यास रंगेहाथ अटक केली.
 
यावल पोलिसात रात्री आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0