प्रत्येक शेतकर्‍याने माती परीक्षण करण्याची गरज

07 Dec 2018 11:08:44

बोदवडला मृदा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात रामदास पाटील यांचे प्रतिपादन


 
बोदवड : 
 
माती परीक्षण गरचेचे असून जास्त उत्पन्नाची हमी देणारे आहे जमिनीला कोणत्या खताची मात्रा किती द्यावी याची अचूक माहीती मिळते.
 
कृषी विभागाने प्रत्येक गावातील शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करुन शेतकर्‍यांना मदत करावी असे प्रतिपादन बाजारसमितीचे संचालक रामदास पाटील यांनी केले.
 
कृषी विभाग व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नुकताच जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 50 शेतकर्‍यांना मृदा आरोग्य पत्रिेचे वाटप करण्यात आले.
 
रासायनिक खताच्या अति वापराने जमिनीचा सामू कमी होत असून जमिन नापीक होत आहे. रासायनिक खताबरोबर शेणखत सुध्दा वापरावे. तसेच सेद्रीय शेतीकडे वळावे असे पाटील यानी सागितले.
 
यावेळी कृषी सहाय्यक के.एच बिटके यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक पंकज माळी, श्री.इंगळे, एन.पी महाजन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0