गावठाण जागेवरील दिव्यांगाची अतिक्रमित घरे नियमित होणार

07 Dec 2018 10:50:17

जागतिक अपंग दिनी प्रांताधिकारी कचरे यांची माहिती

 
 
पाचोरा :
 
आगामी लोकसभा ,विधानसभा निवडणुकीत निवडणूकीत मतदानाच्या दिवशी प्रत्येक अपंगांच्या घरी शासकीय वाहन पाठवून त्यांना या वाहनातून मतदान केंद्रावर नेले जाईल व परत त्यांना घरी सोडले जाणार आहे.
 
शासन निर्णय नुसार शासकीय अथवा गावठाण जागेवर 1 जानेवारी 2011 पूर्वी असलेली अतिक्रमित अपंगांची घरे ही नियमित केले जाणार असल्याची प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सागितले.
 
उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय पाचोरा यांच्यातर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त मतदानाची जनजागृती व्हावी म्हणून येथील शिवाजी महाराज चौकातून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.
 
 
तसेच यावेळी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीपर शाळेत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तील पत्रकार, महसूल विभागातील चांगले काम करणारे अपंग कर्मचारी बांधव, पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन प्रांताधिकारी कचरे व उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
 
यावेळी पाचोरा तहसीलदार बी.ए. कापसे, तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, उपविभागीय अभियंता एस. व्ही. पाटील, शाखा अभियंता डी. एम. पाटील, शाखा अभियंता एस. डी. महाजन, कालिंदिनी पांडे, मतिमंद शाळेचे श्री. पांडे, माध्यमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक पवार उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0