'बाळूमामा...' मालिकेत उलगडणार ‘ही’ कथा

05 Dec 2018 18:01:20

 


 
 
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ लोकप्रिय मालिकेत लवकरच एक नवे वळण येणार आहे. कुणकेश्वर येथील शिव मंदिराची आख्यायिका या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. पुढील आठवड्यात मालिकेत अनेक घटना घडणार आहेत. मालिकेत बाळूने चंदुलाल व्यापाऱ्यावर नाराज होऊन त्याचे घर सोडून दिले आहे. चंदुलाल व्यापाऱ्याची आई बाळूला जेवायला द्यायला तिच्या सुनेला नकार देते. बाळूला तीन दिवस उपाशी ठेवते. बाळू आता चंदुलाल व्यापाऱ्याच्या घरी नसल्याने त्याच्या गावातील सर्वचजण बाळूच्या विचाराने हैराण झाले आहेत.
 

गावकऱ्यांना बाळू कुठेच सापडत नाही. चंदुलाल व्यापाऱ्याचे घर सोडल्यावर वाटेत बाळूला एक साधू भेटतात. बाळू त्या साधूंबरोबर देवगड येथील प्रसिद्ध कुणकेश्वर शिवमंदिराकडे जायला निघतो. या आठवड्यात प्रेक्षकांना मालिकेत कुणकेश्वर मंदिराची आख्यायिका पाहायला मिळणार आहे. तसेच कुणकेश्वर येथील शिव मंदिरात बाळू एक प्रतिज्ञा घेणार आहे. ही प्रतिज्ञा काय असणार? याचे कोडे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना उलगणार आहे. बाळू मामा आणि कुणकेश्वर मंदिराविषयी असे म्हटले जाते की, बाळूमामा दरवर्षी कुणकेश्वर येथील शिवमंदिरात अंघोळ करण्यासाठी येतील आणि साधूंना भेटतील. असे वचन बाळूमामा यांनी त्या साधूंना दिले होते.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0