केकतनिंभोरे येथे मराठा समाजातर्फे ना. गिरीश महाजन यांचे स्वागत

04 Dec 2018 12:50:13

 
केकतनिंभोरा ता. जामनेर :
 
तालुक्यातील केकतनिंभोरे येथे मराठा समाजबांधवांतर्फे जळगावहून जामनेरकडे येत असताना ना. गिरीश महाजन यांचे नुकतेच स्वागत करण्यात आले.
 
ना. गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने मराठा समाजबांधवांतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
 
यावेळी जामनेर न.पा.भाजपा गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, शेतकरी संघ उपाध्यक्ष बाबुराव गवळी, ईश्वर भोंडे, सुपडू पाटील, प्रफुल्ल पंडित, अमोल पाटील, पिंटू हिवरे, नामदेव शिंदे, निवृत्ती पाटील, बाळू पाटील, सुधीर शिंदे भाजपा कार्यकर्ते, मराठा समाजबांधव उपस्थित
होते.
Powered By Sangraha 9.0