जेट एअरवेजमधून प्रवास उपाशीपोटी !

04 Dec 2018 15:56:54


मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली भारतातील प्रमुख विमान कंपनी जेट एअरवेजने आता आणखी एक निर्णय घेतल्याने वाद उफाळून आला आहे. यापुढे इकॉनोमी क्लासने जाणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवण देणार नसल्याचे जेट एअरवेजने जाहीर केला आहे.

 

काही दिवसांपूर्वी जेट एअरवेजने कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आपली बरीच उड्डाणे रद्द केली होती. त्याचा परिणाम जेट एअरवेजच्या शेअरवरही झाला होता. दरम्यान खर्चात कपात करण्यासाठी आता हे पाऊल उचलले जात आहे. इंधनदरवाढ, घसरता रुपया यांमुळे कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या तिमाहीत कंपनीला १ हजार २६१ कोटींचा तोटा झाला होता.

 
जेट एअरवेजच्या इकॉनॉमी क्लासमध्ये पाच श्रेणी आहेत. त्यातील दोन श्रेणींमधली मोफत जेवणाची सोय यापूर्वीच बंद झाली होती. मात्र, ७ जानेवारीपासून मोफत संपूर्ण श्रेणीतील जेवणाची बंद करण्यात येणार आहे. केवळ बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लासमधून परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवण मिळेल. दरम्यान सोमवारीही कंपनीने १४ फेऱ्या रद्द केल्या होत्या.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0