महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार

04 Dec 2018 14:22:57



उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली : अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील ४ दिव्यांगांना व दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २ व्यक्ती आणि ३ संस्थांचा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जागतिक अपंग दिनानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने काल सन्मान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 

यावेळी देशातील दिव्यांगजन व्यक्तींसह दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार २०१८प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे यांना सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार, चार्टर्ड अकाऊंटंट भूषण तोष्णीवाल यांना रोल मॉडेलपुरस्कार, नाशिक स्वयं पाटील याला सृजनशील बालकाचा पुरस्कार तर आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

दिव्यांगांसाठी कार्य करणारे डॉ. योगेश दुबे आणि प्रा. रवी पुवैय्या यांच्या वैविध्यपूर्ण कार्याची दखल घेऊन दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड मनपा व पुणे येथील मॉडर्न कॉलेजला गौरवण्यात आले. तसेच नॅब इंडियाला दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0