मराठा समाजातर्फे एरंडोलला जल्लोष

04 Dec 2018 12:57:55

 
एरंडोल :
 
राज्य शासनाने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केल्यामुळे मराठा समाजाच्या वतीने येथील धरणगाव चौफुली येथे फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
राज्य शासनाने सकल मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय दिल्याची भावना नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी व्यक्त केली. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हा समाजाने केलेल्या संघर्षाचा विजय असल्याचे सांगितले.
 
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनास अन्य समाजानेही पाठिंबा दिल्याबद्दल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी दखल घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
 
राकेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शहीद झालेल्या 45 समाजबांधवांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी उपनगराध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, आर.डी. पाटील, पत्रकार शिवाजीराव अहिरराव, रतिलाल पाटील, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सुदाम पाटील, पंडित सूर्यवंशी, संदीप बोडरे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद दंडवते, भाईदास पाटील, उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0