डॉ.धर्मेंद्र पाटील यांचा गौरव

04 Dec 2018 11:58:59

 
 
 
जळगाव : 
 
वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 रोजी शहरातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील यांचा वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी केलेली निस्वार्थ सेवा लक्षात घेऊन सत्कार केला.
 
 
ना.गिरीश महाजन यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यास अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्यासह डॉ.धर्मेंद्र पाटील यांचे मोठे योगदान लाभले.
 
वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी सर्व विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्तता करण्यासाठी डॉ. पाटील यांनी प्रयत्न केले. शहरासह इतर जिल्ह्यातील डॉक्टरांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब रुग्णांना सेवा देण्याचे आवाहन करून आवश्यक असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्तता केली.
 
 
सत्कार सोहळ्याप्रसंगी शहराचे आ. सुरेश भोळे, आ. स्मिता वाघ, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, उदय वाघ, भगत बालाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0