व्हॉट्सअॅपवर पाठवता येणार निळ्या रंगात मेसेज

03 Dec 2018 15:57:23



व्हॉट्सअॅप हे सोशल मीडिया अॅप आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या वापरकर्त्यांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅप देखील नेहमी पुढाकार घेत नवनवीन फीचर्स अपडेट करत असते. अलीकडच्या काळातील स्टीकर्स असो किंवा व्हॉट्सअॅप पेमेंटची चर्चा ही व्हॉट्सअॅपची फीचर्स तुफान गाजते आहेत. अशातच आणखी एक अशीच चर्चा आहे ज्यामध्ये व्हॉट्सअॅपवर निळ्या रंगाचे मेसेज पाठवणे शक्य झाले आहे. मात्र हा निळ्या रंगाचा मेसेज कसा पाठवायचा? हे मात्र अनेक जणांना माहिती नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर निळ्या रंगाचा मेसेज कसा पाठवायचा याबाबत माहिती जाणून घेऊयात...

 

१) व्हॉट्सअॅपवर निळ्या रंगात मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअरवरून WhatsBlueText हे अॅप डाऊनलोड करावे लागेल.

 

२) त्यानंतर हे अॅप चालू करून Start Writing या पर्यायावर क्लिक करा.

 

३) यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये Input Text हा पर्याय असणार आहे.

 

४) यामध्ये तुम्ही तुमचा मेसेज टाईप करून दिलेल्या पर्यायांपैकी पहिल्या पर्यायावर क्लिक करा.

 

५) यानंतर तुमचा मेसेज कॅपिटल लेटर्समध्ये निळ्या रंगात दिसेल.

 

६) हा मेसेज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवर बिनधास्त शेअर करु शकता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0