जळगाव रनर्स ग्रुपच्या खान्देश रन मॅरेथॉनमध्ये चार हजार स्पर्धक सहभागी

03 Dec 2018 10:07:55

भिमसिंग वळवी, अश्विनी काटोले विजयी 


जळगाव : 
 
जळगाव रनर्स ग्रुपने आयोजित केलेल्या खान्देश 10 किमी रन मॅरेथॉनमध्ये पुरूषांच्या गटात भिमसिंग वळवी याने तर महिला गटात अश्विनी काटोले हिने विजय मिळवला.
 
3 प्रकारच्या या शर्यतीत चार हजार धावपटू सहभागी झाले होते. या शर्यतीला कडाक्याच्या थंडीत सकाळी सहा वाजता सागर पार्क येथून सुरूवात झाली. सागर पार्क ते लांडोरखोरी आणि पुन्हा सागर पार्क असा या शर्यतीचा मार्ग होता.
 
सर्वाधिक अंतराच्या आणि धावकांची कसोटी पाहणार्‍या 10 किमीच्या शर्यतीत भिमसिंग वळवी याने 33.27 मिनिटांची वेळ नोंदवली तर दुसरे स्थान भगतसिंग वळवी याने तर तिसरे स्थान विशाल कुंभार याने पटकावले.
 
महिला गटात अश्विनी काटोले हीने 42.40 मिनिटांची वेळ नोंदवत पहिले स्थान मिळवले. तर दुसर्‍या स्थानी आरती पाटील हिने 52.22 मिनिटांची वेळ नोंदवली. तर दीपा बाविस्कर हिने 61 मिनिट 34 सेंकदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले.
 
उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले. गिर्यारोहक डॉ.किशोर धनकुडे, रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव आणि सदस्य उपस्थित होते.
 
पारितोषिक वितरण प्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, डॉ.जालिंदर सुपेकर जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील ,तहसिलदार अमोल निकम,, प्रा.डी.डी. बच्छाव, संदीप पाटील, डॉ. रवी हिरानी, विक्रांत सराफ, मिलिंद राठी उपस्थित होते. टाळ्यांच्या कडकडाटात, जल्लोषात बक्षिस वितरण झाले.
अन्य निकाल असे
 
10 किमी - महिला - 31-45 वयोगट - शारदा भोयर 48 मिनिट, कविता पाटील 54.22 मिनिट, दीपा बाविस्कर 1.1.34
पुरूष - 36-50 वयोगट - सारंग विंचोनकर 40.3 मिनिट, विलास डोईफोडे 41.08, दत्ताकुमार सोनावळे 43.13,
पुरुष 51-99 वयोगट - नागुराव भोयर 43.36, देविदास गजभिये 47.21, रामचंद्र झोपे 56.20
महिला 46-99 वयोगट - विद्या बेंडाळे 1.2.26, निना डोकानिया 1.9.54, सिमा पाटील 1.18.45
Powered By Sangraha 9.0