केंद्रीय गृह मंत्रालयाचे डिजिटल पाऊल

03 Dec 2018 16:24:03


 


@CyberDost ट्विटर हँडलवरुन सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृती

 

मुंबई : देशातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने आता ट्विटरचा वापर सुरु केला आहे. यासाठी ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले असून याद्वारे, सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती केली जाणार आहे. या हॅण्डलवरून बँकेचा युजर आयडी, एटीएम/डेबिट कार्डचा क्रमांक व पिन, पासवर्ड, ओटीपी कोणाही व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन गृह मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.

 

वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर देशात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. मात्र नागरिकांमध्ये याविषयी पुरेशी जनजागृती नसल्यामुळे अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ही पावले उचलली असल्याचे सांगण्यात येत आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात येणार आहे. मार्च २०१८ मध्ये या हँडलची सुरुवात केली होती मात्र, पुन्हा याचा जोरदार प्रचार सुरु केला आहे.

 

ऑनलाईन तक्रार दाखल करा

 

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटर हॅण्डल सोबत https://cybercrime.gov.in/cybercitizen/home.htm# वेबसाईट सुरु केली आहे. यामध्ये तुम्ही सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवू शकता. तसेच तुम्हाला इतर माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0