मुंबई-पुणे महामार्गावर २ अपघात ; दोंघांचा मृत्यू

03 Dec 2018 15:09:11


 


पुणे : सोमवारी सकाळी मुंबई-पुणे महामार्गावर २ अपघात झाले. या अपघातांमध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण जखमी आहेत. पहिला अपघात हा पिंपोळी येथे तर दुसरा कामशेत बोगद्याजवळ झाला. मृतांची ओळख अजून पटली नसून खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार चालू आहेत.

 

पहिला अपघात हा कामशेत पिंपोळी गावाच्या हद्दीमध्ये झाला. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या रस्त्यावर झायलो आणि ट्रकची धडक झाली. यामध्ये २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. दुसरा अपघात हा कामशेत बोगद्याजवळ झाला. मुम्बावरून पुण्याकडे येणारी कार दुभाजकाला धडकली. यामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला आहे. चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0