राजस्थान गोठले ; पारा गेला -४.५ अंशावर

29 Dec 2018 16:28:54



जयपूर - देशभरात थंडीचा कडाका वाढतच चाललेला आहे. राजस्थानमध्ये थंडीने ३० वर्षातील रेकॉर्ड तोडला आहे. राजस्थानचे शनिवारचे तापमान -४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे लोकांचे जनजीवन प्रभावित झाले आहे. फतेहपूर हवामान खात्यानुसार डिसेंबर महिन्यात तब्बल १६ दिवसांपासून तापमान शून्य अंशाच्या खाली गेले आहे.

 
जवळपास ३० वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये पारा शून्य अंशाच्या खाली गेला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता पाहायला मिळत आहे. थंडीमुळे रब्बी पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हातचे पिक जाण्याची चिंता लागली आहे. दौसा प्रदेशात गेल्या २ दिवसांपासून तापमानात अत्याधिक घट झालेली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे बाजारात उबदार कपडे, गरम खाद्यपदार्थ तसेच गिझर, हीटरसह अन्य उपकरणांची मागणी वाढत आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0